बातमी

मुरगूडमधील एम डी रावण – ” सृजन शिल्पकार पुरस्काराने सन्मानीत “

मुरगूड – ( शशी दरेकर) – मुरगूड ( ता कागल) चे माजी नगरसेवक व जेष्ट शिल्पकार एम .डी. रावण यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर चा ‘ सृजन शिल्पकार पुरस्कार ‘ बहाल करण्यात आला.थोर विचारवंत व लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूरच्या करविर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .जे. बी. शिंदे हे होते.

शिल्पकार श्री एम. डी. रावण. मुरगूड ता. कागल जि. कोल्हापूर येथे कायमचा रहिवास असलेल्या अवलियाने अंगी असलेल्या उपजत कलामुळे कोणतेही कला शिक्षण न घेता सुमारे २७ विविध प्रकारच्या कलांमध्ये प्राविण्य असलेल्या एम. डी. रावण यांनी फक्त १६ वर्षाच्या अल्प कालावधीत महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सुमारे १५९ गावांतील मंदिरातील देव-देवता व इतर तत्सम कामे केली आहेत.

धातू, मार्बल, फायबर, सिमेंट इत्यादी माध्यमातून अनेक मूर्ती, पुतळे, प्रभावळी, कळस, पशुपक्षी, प्राणी इत्यादी कामं करण्यात हातखंडा असलेला हा अवलिया माणूस आहे. साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व विधायक कार्ये करण्यात नेहमीच त्यांच प्रमुख पुढाकार असतो.


संत बाळुमामा मंदिर आदमापूर येथे पितळ धातूमध्ये बकरा, कुत्रा, प्रभावळी तर मेतगे मंदिरातील पितळी खांब व कळस शिल्पकार एम डी रावण यांनीच तयार केला आहे.नवीन पनवेल येथे साकारलेल्या श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई व श्री तुळजाभवानी या मंदिराच्या १५० बाय ५० फूट आकाराच्या तंतोतंत जशाच्या तशा भव्य प्रतिकृती केवळ पांच दिवसांत त्यांनी साकारल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज तोफेसह हा लाईफ साईजचा पुतळा ,६ मराठा बटालियन जम्मू काश्मीर येथे व सिंहासनारुढ ८ फूट उंचीचा पूतळा कर्नाटकातील मांगूर येथे केलेला आहे. हैद्राबाद व बेंगलूर येथे पशूपक्षींचे पुतळे दिलेले आहेत.

क्रीडा प्रकारात त्यांचे भरीव योगदान आहे. राष्ट्रीय पातळीवरील व्हाॅलीबाॅल स्पर्धा व राज्य स्तरीय कब्बडी स्पर्धा, कुस्ती, मैदानी इत्यादी स्पर्धांचे प्रत्येक वर्षी सात्याने उत्कृष्ट संयोजन व आयोजन ते करत आले आहेत. चौफेर ज्ञान असलेले मनमिळाऊ, निगर्वी, लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.चार तालुक्यातील शेकडो कलाकारांच्या जो जे वांच्छिल व्यासपीठाचे ते संकल्पक आहेत.

मुरगूड च्या सामाजिक राजकिय जीवनातील त्यांचे भरीव योगदान कोणालाही विसरता येणार नाही. अध्यत्म विज्ञान आदि चौफेर ज्ञान असलेले मनमिळावू, निर्गवी, लोकप्रीय।असे हे व्यक्तीमत्व आहे. अशा या थोर विभूतीला मिळालेल्या पुरस्कारामूळे त्यांचा सन्मान तर झालाच शिवाय ज्यांनी हा पुरस्कार दिला त्या संस्थेने श्री रावण यांची या पुरस्कारासाठी केलेली निवड ही योग्यच असल्याची प्रतिक्रिया मुरगूड येथील जेष्ठ सेवाभावी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जयवंतराव हावळ यांनी दिली. हा पुरस्कार प्रदान करताना जिल्हा गोकूळ दुध संघाचे माजी अध्यक्ष अरूणराव नरके,प्रा.संभाजीराव पाटील, चित्रकार संजय शेलार, बाबुराव शिरसाट, किरण पाटील आदि उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *