बातमी

सकस आहार, योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा – डॉ. निता नरके

पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर येथे झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार होते.

सकस आहार,योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा असे आवाहन मानवाधिकार पत्रकार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. निता नरके यांनी केले. डॉ. निता नरके पुढे म्हणाल्या,बेकरीजन्य पदार्थ व जंक फूड यांचा आहारात समावेश झाल्याने आपण आजाराला निमंत्रण देत आहोत.यामुळे आपण यापासून दूर राहावे.

प्रौढांना कोविड प्रतिबंधक लस दिलेली आहे मात्र विद्यार्थी अजुन त्यापासून वंचित आहेत यामुळे स्वच्छता व नियमांचे कटाक्षाने पालन करावे. यावेळी मानवाधिकारी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल कामत, उपाध्यक्ष रोहित कामत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आर. व्ही. इंगवले यांनी केले तर आभार एम. जी. मोरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *