बातमी

विनापरवाना शर्यतीचे आयोजन केल्याने अनिल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार

मुरगूड ( शशी दरेकर ) : नंद्याळ ते अर्जूनवाडा या-मार्गावर दि.८:२:२०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता नंद्याळ येथील अनिल आनंदा चव्हाण यांनी कोणत्याही शासकीय कार्यालयांची परवानगी न घेता घोडागाडी शर्यतीचे आयोजन करून या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य करून या रस्त्यावरील दोन्हीकडील वाहने रोखून बेकायदेशीररीत्या वाहतूक अडवून धरली.

त्याबद्दल स्वप्नील विलासराव मोरे यांनी अनिल चव्हाण यांच्या विरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दि.९.२.२०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *