लोकशाही वाचविण्यासाठीचं  मी निवडणूक रिंगणात – शाहू छत्रपती

केनवडे शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा

व्हनाळी (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची स्पुर्ती घेवून मी येथे आलो आहे. शाहू महाराजांनी शिक्षण आणि भौतिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. शाहू मिल च्या माध्यमातून अनेक गरजूंना रोजगार मिळाला येणा-या काळात आपण समाज उपयोगी कामे करणार आहोत. हि निवडणूक आता वेगळ्या वळणावर आली असून एकाधिकार शाही घालवून लोकशाही अधिक बळकट करायची आहे. सध्या संविधान व लोकशाही मोडून काढण्याचा डाव या विरोधी सरकारचा आहे तो आपण हानून पाडू संविधान वाचविण्यासाठीच मी निवडणूक रिंगणात उभा आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांनी केले.

Advertisements

            केनवडे ता.कागल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी संजयबाबा घाटगे होते.
संजयबाबा घाटगे म्हणाले, शाहू महाराज आमच्या पंचक्रोशीत आले हे मी भाग्य समजतो. शेतक-यांच्या विविध प्रश्न विधीमंडळात प्रखडपणे मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लोकविरोधी सरकारला आद्दल घडविण्यासाठी शाहू महाराजांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देवून लोकशाही वाचवूया असे त्यांनी आवाहन केले.

Advertisements

तर प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय….

यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, ,हर्षेल सुर्वे, शिवानंद माळी,व्ही.बी.पाटील,शिवसेनेचे सुनिल शिंत्रे, विजय देवणे,संभाजी भोकरे,धनराज घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी विद्या गिरी,कांचन माने,कु.विरेन घाटगे, जयसिंग टिकले,नागेश आसबे,बाबुराव शेवाळे, धोंडिराम बाळू  पाटील,उपसरपंच शुभांगी पाटील,साताप्पा तांबेकर, आनंदा खंडागळे,हिंदूराव मगदूम,धोंडिराम एकशिंगे,आनंदा तळेकर,बाजीराव पाटील,शहाजी तांबेकर,मारूती दौलू पाटील,पंडित दंडवते,पंडीत चव्हाण,हिंदूराव लोखंडे,रणजित गायकवाड,शामराव पोवार, डॅा.,संजय चिंदगे,पिंटू दावणे,चंदर पाटील,दत्ता दंडवते व महिला उपस्थित होत्या.   स्वागत सुभाष पाटील यांनी केले आभार शहाजी तांबेकर यांनी मानले.

Advertisements

ज्यांना विकासच समजला नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!