कागल : येथील कागल ज्युनियर यांच्या वाड्यात पारंपारिक पद्धतीने शाही दसरा महोत्सव साजरा होणार असून कागल शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत सीमोल्लंघनचा शाही सोहळा बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता होणार आहे अशी माहिती शाही दसरा समिती कागल यांनी रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमंत अखिलेशराजे घाटगे यांनी माहिती दिली. यावेळी मानकरी आबा उर्फ आनंदा हवालदार, आशिष हवालदार, दत्ता चव्हाण सह राजेंद्र कचरे, पप्पू कुंभार, संग्राम भोसले, विक्रम माने, मुख्याध्यापक विलास मगदूम उपस्थित होते आदी उपस्थित होते.
कागल ज्युनियर यांच्या वाड्यात शाही दसरा महोत्सव पूर्वापार साजरा होत आला आहे. नंतरच्या काळात या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचे स्वरूपही विस्तारत गेले. पण गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे हा सोहळा साजरा होऊ शकला नव्हता. मात्र यंदा हा शाही दसरा महोत्सव साजरा करावयाचा असून पारंपारिक वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या गजरात श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे, मान. श्रीमंत अखिलेशराजे घाटगे व नागरिक त्यांच्या उपस्थितीत सिमोहलंघनाचा शाही सोहळा पार पडणार आहे.
याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराणेतील श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे व मान. श्रीमंत अखिलेशराजे घाटगे सोने स्वीकारण्यास वाड्यामध्ये हजर असणार आहेत. तरी कागल मधील सर्व नागरिकांनी या शाही सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन शाही दसरा महोत्सव समितीने केले आहे.