मुरगूड (शशी दरेकर) – लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा साईनाथ महाद्वाड यांने सदाशिवराव मंडलिक फिरता चषक , रोख रुपये ५ हजार एक व प्रमाणपत्र असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .अर्जून कुभार, स्पर्धा समन्वयक प्रा . डॉ .शिवाजीराव होडगे, उप प्राचार्य डॉ .टी. एम . पाटील, . डॉ. ए .जी. मगदूम आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
द्वितीय क्रमांक तेजस्विनी पांचाळ नाईट कॉलेज इचलकरंजी व चैतन्य कांबळे यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक गणेश लोळगे अशोकराव माने इंजिनिअरिंग कॉलेज वाठार याना तर येथील सदाशिव मंडलिक महाविद्यालयाच्या साक्षी कदम यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून महात्मा फुले दूध संस्था चिमगाव, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी सर्वंट को. आँप. सोसायटी मुरगुड, राजर्षि शाहू ना. सह. पतसंस्था मुरगुड, जय शिवराय सहकारी दूध संस्था मुरगुड या संस्थांनी पारितोषिके दिली. मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेमध्ये पार्वतीबाई मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. जयवंत सुतार सरवडे, प्रा. आप्पासाहेब बुडके आजरा महाविद्यालय आजरा, प्रा. राजेश पाटील कोल्हापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेमध्ये नांदेड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली या विभागातील स्पर्धकांनी मोठ्या संखेने सहभाग घेतला होता, २१ वर्षे सातत्याने चालू असणाऱी ही स्पर्धा महाराष्ट्रातील एक नामवंत वक्तृत्व स्पर्धा मानली जात आहे.
स्वागत प्रास्ताविक डॉ. ए. जी. मगदूम तर आभार स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. शिवाजीराव होडगे यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडलिक महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक वृंद यांनी परीश्रम
घेतले.