मुरगूड (शशी दरेकर) :समाजाला मार्गदर्शन करणारा व आनंदी जीवन व्यतीत करनाराच जेष्ठ नागरीक असतो .शासकीय योजनांची माहिती , आरोग्याच्या चांगल्या सवयी, कायदे व पोलिसाचे सहकार्य घेऊन आपले जीवन जेष्ठानी समाजात मिळून मिसळून आनंदाने व सुरक्षितपणे घालवावे विरंगुळा केंद्रात नियमित येऊन स्नेहबंध घट्ट करावेत , वाचन , कॅरम , बुद्धिबळा सारखे खेळ खेळावेत असे जेष्ठाना मार्गदर्शन केले . मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने ” जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जेष्ठानां मार्गदर्शन करतानां माजी प्राचार्य पी .डी. मगदूम बोलत होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मयत सभासद पांडुरंग लोकरे , बाजीराव पुजारी , निर्मला अनावकर . यांना _श्रद्धांजली वाहण्यात आली.
संचालक श्री . एम .टी सामंत यांनी जेष्ठ नागरिक दिनाविषयी माहिती देऊन शासनाने दिलेल्या सवलती , कायदे व
इतर माहिती स्पष्टपणे कथन केली . त्यानंतर ७५ वर्ष पूर्ण झालेले संघाचे जेष्ठ सभासद श्री पुडलिक कांबळे , श्री मदन सातवेकर यांचा , शाल , श्रीफळ व पेढा भरवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्याचबरोबर श्री महादेवराव साळोखे , श्री चंद्रकांत दरेकर यांच्यासह संघाच्या ११ सदस्यांचे वाढदिवस गुच्छ व पेढा भरवून जेष्ठांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतले.
श्री . मदन सातवेकर , श्री .डी.डी . चौगले , श्री . पी .व्ही. पाटील यांनी जेष्ठ नागरिक संघाची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या . प्रास्ताविक श्री . जयवंत हावळ यांनी केले . उपस्थितांचे-स्वागत श्री . गजाननराव गंगापूरे तर आभार श्री . रणजीतसिंह सासणे यानीं मानले . या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक श्री . किरण गवाणकर , एस .व्ही. चौगले ( सर ), बाजीराव खराडे, सुभाष अनावकर , सभासद , जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .