बातमी

चांगल्या विचारातून समाज आणि राष्ट्रउन्नती होते – प्रा. डॉ. नदकुमार मोरे

मुरगूड ( शशी दरेकर ) :चांगल्या विचारातून समाज आणि राष्टउन्नती होते. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.

लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या ८८ व्या जंयती निमित्य येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा .डॉ. मोरे ,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कै . दादोबा मंडलिक सभाग्रहामध्ये झालेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी, महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष युवानेते अँड. वीरेंद्र मंडलिक होते. प्रा. डॉ.मोरे , माणसाच्या अंगी अनेक कौशल्य असतात. त्यातील बोलणं हे कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी चौफेर , प्रचंड वाचन , मोठ्ठा व्यासंगही असावा लागतो आणि हे साध्य करायचे असेल तर मोहमाया बाजूला ठेवून पुस्तकाची कास धरा. चांगल्या माणसाची सदैव संगत करा असा मौलिक सल्लाही डॉ. मोरे यांनी दिला.

बोलण्याची कला विकशीत करीत , केवळ पोपट बनू नका .कारण सभा घडविणे आणि सभा बिघडविणे ही ताकद वक्त्याच्या शब्दात असते. दारिद्रयाचे चटके भोगणारा हिटलर केवळ शब्दाच्या ताकतीच्या जोरावर जग जिंकायला निघाला ही घटना डॉ. मोरे यांनी स्पर्धकांना सांगितली.
सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकनेते सदाशिवराव मंडलिकाच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

स्पर्धचे समन्यवयक प्रा डॉ. शिवाजीराव होडगे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची उदिष्ठे विषद करत प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले ते म्हणले ही स्पर्धा म्हणजे नव्या पिढीतील ज्ञानोपासकांना खास मेजवानी ठरणार आहे. सदाशिवराव मंडलिक हे राजकारणातील एक दीपस्तंभ होते. शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांचा तो संगम होता. समाजाचे दुःख आणि दारिद्र्य समजून घेणारे ते महामानव होते. बळीराजासाठी पाणी , त्याच प्रमाणे साखर उद्योग उभारून त्यांनी दुखे बाजूला सारण्याचा प्रयत्न केला . गोरगरिबांच दुःख हे स्वतःच दुःख समजून घेणारा असा हा अद्वितीय नेता होता. हे स्पर्धेचे व्यासपीठ सर्व नव्या पिढीला त्याची माहिती करून देणार असल्यामुळे हा उपक्रम कॉलेजने राबवला असून निश्चितच युवा पिढीला ही एक पर्वणी ठरणार आहे. हा उपक्रम कॉलेज मार्फत २१ वर्ष राबविला जात आहे.

दरम्यान अॅड वीरेंद्र मंडलिक मराठी विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे, संस्थेचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार डॉ आप्पासाहेब बुडके डॉ जयवंत सुतार प्रा .राजेश पाटील प्रा .डॉ शिवाजीराव होडगे यांचा महाविद्यालयाचे वतीने नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी प्रा डॉ शिवाजी होडगे संपादित ” झेप ” या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यातून स्पर्धक येतात. ते लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या जीवन कार्याचा इत्यंभूत अभ्यास करून येतात. यावरून स्वर्गीय मंडलिक साहेबांच्या कार्याची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे. ही गोष्ट साऱ्यांनाच अभिमानाची आहे. एक नंबर गाठणारच अशी जिद मनी बाळगून स्पर्धकांनी स्पर्धेत उतरावे. स्पर्धकांनी बोलताना कोणाचेही दडपण मनावर न घेता, . जीभेवर सारवर व डोक्यावर बर्फ ठेवून जास्तीत जास्त चिकाटी करा. तरच तुम्हाला यशोशिखर गाठता येईल. असा आशावादही अडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.

प्रा . तृप्ती गवाणकर व प्रा. सुशांत पाटील यांनी सुत्रसंचालन तर प्रा. पी. एस . सारंग यानी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, तसेच सर्व प्रशासकीय सेवकांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *