बातमी

वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने मुरगूड मध्ये आरोग्य विभाग भगिनी, ऊस तोडणी कामगार भगिनी व खुदाई कामगार भगिनींसाठी भाऊबीज समारंभाचे आयोजन

सामाजाचे भान ठेवून उपक्रमांचे माध्यमातून समाज सेवा करणारे वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार.

मुरगूड ( शशी दरेकर ) – आरोग्यविभाग भगिनींसाठी भाऊबीज समारंभ म्हणजे वनश्री मोफत रोपवाटिकेचा सामाजिक ऐक्य जोपासणेचा स्तुत्य उपक्रम होय . या उपक्रमामुळे वनश्री रोपवाटीका म्हणजे असंख्य भगिनीचे माहेरघर बनले आहे .असे समाजिकभान साऱ्यांनी जोपासल्यास समाजमन विकसित व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी केले . ते वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने आरोग्य विभाग भगिनींसाठी आयोजित भाऊबीज कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बहुजन जनजागृती संस्थेचे संस्थापक एम . टी. सामंत होते. प्रारंभी प्राचार्य बी एस . माने यांचे हस्ते बळीराजांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले.

मुरगुड नगरपालिका आरोग्य विभाग भगिनिना साडी फराळ वाटप व झाडमाया मित्र परीवारास या भगिनींकडून औक्षण करणेत आले. याप्रसंगी प्राचार्य बी.एस्.माने, अंनिसच्या सारीका पाटील, स्मीता कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली .
त्यानंतर मुरगूड , निढोरी, भडगाव, कुरणी , चिमगाव , दौलतवाडी , शिंदेवाडी आदी गावांदरम्यान असणाऱ्या ऊसतोडणी व खुदाई कामगारांच्या तळांवर जाऊन तेथील भगिनींनाही भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी फराळचे वाटप करणेत आले. उपक्रमाचे हे १० वे वर्ष आहे.

यावेळी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार, एम.टी. सामंत , प्राचार्य बी एस माने, प्रा.आनंद चव्हाण, श्रीमती एस बी पाटील , प्रा डॉ शिवाजीराव होडगे , वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी , सचिन सुतार , विकास सावंत , सतीश कांबळे, प्रदीप वर्णे , संभाजी भोसले, बबन बारदेस्कर, भीमराव कांबळे , प्रदिप सुर्यवंशी, विक्रमसिंह पाटील , नंदकुमार पाटील, भरत साळोखे, सारिका पाटील, स्मिता कांबळे , प्रांजल कांबळे, मृत्युंजय सुर्यवंशी, प्रशांत परीट,आदींसह आरोग्य विभाग भगिनी व झाडमाया मित्रपरीवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते .
उपस्थितांचे स्वागत विकास सावंत प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी तर आभार सतीश कांबळे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *