व्हनाळी (सागर लोहार): शिव सहकार सेना कागल तालुका संघटकपदी बेलवळे बुद्रुक ता.कागल येथील गुंडाप्पा राऊ काशीद यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पोवार यांचे हस्ते कोल्हापूर सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांना देण्यात आले. शिवसेनापक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे शिव सहकार अध्यक्षा शिल्पाताई सरपोतदार यांच्या आदेशाने त्यांची नियृक्ती करण्यात आली. या निवडी कामी जिल्हा प्रमुख विजय देवणे,उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे,सुजीत चव्हाण शिव सहकार सेना कोल्हापूर जिल्हा संघटक संजय जाधव , तालुकाप्रमुख अशोकराव पाटील,यांचे सहकार्य लाभले.
