बातमी

मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या सभासदानां भेटवस्तूंचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) :
मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचीत असणाऱ्या श्री . गणेश नागरी सह . पतसंस्थेच्या वतीने दिपावली निमित्य ५ लिटर -खाद्यतेल , वाटप व १५ टक्के डिव्हीडड वाटप संस्थेचे सभापती श्री .एकनाथ शं . पोतदार व संस्थापक श्री , उदयकुमार छ . शहा यांच्या शुभहस्ते या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले,
मुरगूडची श्री. गणेश नागरी सह .पतसंस्था अल्पावधीतच सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे , या संस्थेने गेल्या ३३ वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.

चालू वर्षात दिपावलीनिमित्य सभासदाना ५ लिटरचा -खादयतेल ( कॅन ) भेटवस्तूंच्या स्वरूपात देण्यात आला .व ठेवीदाराना मुदतबंद१३ महिन्याकरिता ९ .५ टक्के इतका भरघोस व्याजदर देण्यात आला आहे. तसेच कर्जाच्या व्याजदरातही १ टक्का कमी करण्यात आला आहे, कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या सेव कानां-२५ टक्के इतका भरघोस बोनस देण्यात आला आहे. श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेची ३० सप्टेंबर २०२१ अखेर सांपत्तीक स्थिती खालीलप्रमाणे ठेवी-६७ कोटी३४ लाख , कर्जे ५१ कोटी३१ लाख , . वसूल भागभांडवल ३६ लाख२३ हजार , राखीव व इतर निधी -४ कोटी५० लाख , गुंतवणूक २४ कोटी ६७ लाख , खेळते भागभांडवल – ८१ कोटी ४४ लाख , एकूण व्यवहार -२४५ कोटी ७३ लाख , चालू नफा -१ कोटी ०८ लाख , थकबाकी -००.३५ टक्के , डिव्हीडंड १५ टक्के ( २०२१- मार्च ) , ऑडिट वर्ग ” अ ” ही सांपत्तीक स्थिती पहाता या श्री . गणेश नागरी सह, पतसंस्थेने मुरगूड व मुरगूड परिसरात विश्वास संपादन केला आहे .

या भेटवस्तूंच्या वाटपावेळी सभासद- श्री .मधूकर भोसले , श्री .परशराम डोणे , श्री . मोहन ढेरे , श्री . एल् डी . कुडवे ( रावसाहेब ) , श्री , सोमनाथ एरनाळकर .सौ . दिपाली शहा , सौ . सुजाता कुडवे , यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते . तसेच सभापती -श्री . एकनाथ पोतदार , उपसभापती -श्रीमती मंगल यरनाळकर , संचालक सर्वश्री श्री , उदयकुमार शहा , श्री . आनंद देवळे , श्री . सुखदेव येरुडकर , श्री . मारुती पाटील, श्री . अॅड खाशाबा भोसले , श्री . प्रकाश हावळ , श्री . दत्तात्रय कांबळे, सौ. भारती कुडवे, कार्यलक्षी संचालक श्री . राहुल शिंदे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *