बातमी

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकर ब्रँड कोल्हापूर’ पुरस्काराने
सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : पॉवरलिफ्टिंग मध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये १३ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्य पदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी करीत कोल्हापुरचे नाव उज्वल केल्याबद्दल मुरगूडच्या कु. जान्हवी जगदीश सावर्डेकरला ‘ब्रँड कोल्हापूर’ पुरस्काराने आज कोल्हापूर येथे मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमूख उपस्थिती होती .
यापुर्वी सावर्डेकर हिने औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनच्या सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धत तब्बल ४ सुवर्णपदके पटकावली आहेत . गाझीपूर येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय पॉवरलिप्टीग स्पर्धेत एक रौप्य तर दोन कांस्यपदके पटकावली आहेत.

तसेच छावणी, औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत ज्युनियर गटात गोल्ड मेडल तर सिनीयर गटात सिल्व्हर मेडल पटकावले आहे .ठाणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धत तिने ७६ किलो वजन गटात सुवर्णपवक पटकावले आहे .अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत ७९ किलो वजन गटात रौप्यपदकासह राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धत १२ सुवर्ण, ५ रोप्य व २ कांस्यपदके पटकावली आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *