शाहू दूध संघाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा गुरुवारी(ता.९) समरजितसिंह घाटगे व नवोदिता घाटगे या उभयंताच्या हस्ते पायाभरणी
सिध्दनेर्ली : व्हन्नूर ता. कागल येथील श्री. छत्रपती शाहू मिल्क अॅन्ड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत विस्तारीकरणसाठी मंजूर झालेल्या प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ गुरुवारी(ता.९)होणार आहे.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू दूध संघाचे चेअरमन समरजितसिंह घाटगे व संघाच्या कार्यकारी संचालिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे या उभयंतांच्या शुभहस्ते शाहू दूध संघाच्या कार्यस्थळावर सकाळी अकरा वाजता हा पायाभरणी समारंभ होणार आहे.
प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी पुणे तथा प्रभारी उपायुक्त दूग्धव्यवसाय श्री.प्रशांत मोहोड, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री. प्रकाश आवटे,शाहू दूध संघाचे सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होईल.तरी या कार्यक्रमास सर्व सभासद, दुध उत्पादक शेतकरी, ग्राहक व हितचिंतक यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शाहू दूध संघाच्या प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.