कागल (विक्रांत कोरे) : वंदूर तालुका कागल येथील सदाशिव माळकर (धनगर )यांचे पकाली पानंद येथे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये सुरेश गंगाराम गोरडे यांची बकऱ्यांचा कळप गेले चार ते पाच दिवस खतासाठी बसवली आहेत. अज्ञात जंगली प्राण्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवून बारा बकरी ठार केली व अनेक बकरी जखमी अवस्थेत आहेत. यामुळे मेंढपाळांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी रात्रीच्या वेळी. अज्ञात जंगली प्राण्यांनी बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केला. हा हल्ला लहान बकरी असलेल्या ठिकाणी केला. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 12 लहान पिल्ले मृत झाली. तर अन्य दहा ते बारा पिल्ले जखमी आहेत. व आठ ते दहा पिल्ले गायब आहेत. त्यामुळे या मेंढपाळाचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वारंवार जंगली प्राण्यांच्या कडून मेंढरांच्या वर हल्ले होत आहेत. आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे हाता तोंडाच्या समोर आलेला धनगर बांधवांचा घास वन्य प्राण्यांच्या कडून हिरावून घेतला जात आहे. या हल्ल्यामुळे वंदूर आणि पंचक्रोशी मधील लोकांनी धनगर बांधवांच्या बदल हळहळ व्यक्त केली आहे. या मृत बकऱ्यांचा पंचनामा करून सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावली आहे.
हल्ल्याच्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे, तलाठी मिलिंद कांबळे, पोलीस पाटील श्री. निवास पाटील, वनाधिकारी, वनरक्षक ,पशुवैद्यकीय अधिकारी ,मंडलाधिकारी सिद्धनेर्ली ,वंदूर मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.