बातमी

खरेदी योजना हंगाम २०२२-२३ अंतर्गत धान खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत व नाचणी खरेदी ७ मार्च पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,दि. 23 : धान व नाचणी विक्रीकरीता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री करीता २८ फेब्रुवारी व नाचणी विक्री करीता ७ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा sms आला आहे. त्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान व नाचणी विक्री करावी. असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत दादासाहेब खाडे यांनी केले आहे.

जिल्हयामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत माहे नोव्हेंबर २०२२ पासून ९ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असून धान खरेदीची मुदत दि. ३१ जानेवारी २०२३ अखेर देण्यात आलेली होती. धान खरेदीसाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

माहे २२ फेब्रुवारी २०२३ अखेर जिल्यातील १७३९ शेतक-यांनी २७९८१.७० क्विंटल धान व ३६६ शेतक-यांनी २८५२.०५ क्विंटल नाचणी (रागी) खरेदी केंद्रावर विक्री केली आहे. नाचणी खरेदीचे उदिदष्ट संपल्याने खरेदी थांबवण्यात आली होती. नाचणी (रागी) खरेदीचे उदिदष्ट वाढवून देण्यात आले आहे. त्याची खरेदीची अंतिम मुदत हि ७ मार्च २०२३ पर्यंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *