बातमी

कणेरी मठात गायीचा मृत्यू झालेल्या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीना मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील कनेरी मठ येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तब्बल 30 गाय हे गंभीर आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मठावर चित्रीकरण करण्यास गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना आडवत कणेरी मठावरील स्वयंसेवकानी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आले आहे, चित्रीकरण करू नये तसेच बातमी देऊ नये यासाठी ही मारहाण करण्यात आली आहे. तर याबाबत मठावरून माहिती लपवाछपवी करण्याचा प्रकार सध्या होत असून अधिकृतपणे किती गाय मृत्यू झाला आहे हे देखील सांगण्यास टाळमटाळ करत आहेत.

कणेरी मठ येथे सुरू असलेल्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्या दरम्यान 50 हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू पंचमहाभूत लोकोत्सव प्रदर्शन बघण्यास येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारे जेवण हे मोठ्या प्रमाणात शिल्लक पडल्याने सदरचे शिळे जेवण हे गाईंना खाऊ घातल्याने मृत्युमुखी पडले आहेत दरम्यान याठिकाणी संबंधित घटनेच्या माहितीचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या इलेक्ट्रानिक माध्यमांच्या प्रतिनिधांना मठाच्या स्वयंसेवकांकडून मारहाणीचा संतापजनक प्रकार घडला आहे.

टीव्ही नाईन वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी भूषण पाटील याठिकाणी संबंधित घटनेच्या वार्तांकनासाठी पोहचले होते, यावेळी हा प्रकार घडला आहे. गाईंच्या मृत्यूची माहिती मिडीयापासून लपवण्यासाठी कणेरी मठाच्या वतीने दबावतंत्रांचा वापर करण्यात येत असून टीव्ही नाईन च्या प्रतिनिधी सोबत अन्य काही चॅनलच्या प्रतिनिधींनच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान या प्रकाराचा कोल्हापूर प्रेस क्लब सह पत्रकार संघटनेंमधून निषेध व्यक्त करण्यात येत असून या संबंधात गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच संबंधित स्वयंसेवकांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी ही पत्रकार संघटनांकडून करण्यात आले आहे.

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे सुरू असलेल्या या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी लाखो कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.तर याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला असून सध्या या कार्यक्रमात अनेक नेते, राज्यपाल येथे हजेरी लावत आहेत.

तर पर्यावरणाचे महत्त्व व प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथे प्रदर्शन भरवण्यात आले असून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले आहेत. मात्र अपेक्षेपेक्षा कमी आणि या प्रदर्शनाकडे नागरिकानी पाठ फिरवल्याने रोज हजारो किलोचे जेवण वाया जात आहे यामुळे यातील भाकरी चपाती चे ठीक ठिकाणी डोंगर झाले असून हेच सर्व अन्न येथील पशुंना खाऊ घातले जात आहे. तर रोज हजारो लाखो रुपयांचे अन्न वाया जात असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *