बातमी

मुरगुड पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) – येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यक्षेत्रातील शांतता कमिटीची नुकतीच बैठक झाली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

विविध जाती धर्मातील आगामी सण समारंभ, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या आणि मयंत्या आणि सोशल मीडियावरील पोस्ट यामधून अपवादात्मक पारिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोशल मीडिया वर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत, अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत असतील अथवा तसा प्रयत्न केला जात असेल तर, पोलीस प्रशासनाच्या वेळीच निदर्शनास आणून द्यावे, सामाजिक सलोखा व शांतता राखण्यास प्रयत्न व मदत करावी, सामाजिक सलोखा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे असा गैरप्रकार होऊ नये यासाठी सजग नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने शांतता बिघडवणाऱ्या घटकांना काबुत आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन सपोनी विकास बडवे यांनी या बैठकीत बोलताना केले.

या बैठकीमध्ये देवानंद पाटील, ( निढोरी ) ‘ पोलिस पाटील रमेश ढवण ( बिद्री ) सामाजिक कार्यकर्ते -अनिल सिद्धेश्वर, कृष्णात कांबळे ( मुरगूड ), पत्रकार प्रा . रवींद्र शिंदे, महादेव कानकेकर (मुरगूड ), आप्पा रेपे ( चौंडाळ ),सर्जेराव अवघडे ( चिमगांव ) आदींनी मनोगत मांडले.

बैठकीला देवानंद पाटील (निढोरी), पोलीस पाटील रमेश ढवण (बिद्री), सामाजिक कार्यकर्ते अनिल सिद्धेश्वर, कृष्णात कांबळे (मुरगुड), पत्रकार प्रा. रवींद्र शिंदे, महादेव कानकेकर (मुरगुड), आप्पा रेपे (चौंडाळ), सर्जेराव अवघडे (चिमगाव), महिला पोलीस पाटील सविता पवार (करंजीवणे), दुकान व्यावसायिक स्नेहल पाटील (कुरुकली) यांच्यासह पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. स्वप्निल मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *