बातमी

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्य मुरगूड मध्ये लाडु वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : पालकमंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड मध्ये लाडू वाटप करण्यात आले . वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी   जोतिराम सुर्यवंशी  म्हणाले, कोल्हापूर जिल्हयात हजारो मंदिरांना निधी आणला आणि आज रामनवमी दिवशीच त्यांचा वाढदिवस साजरा होतो.

  कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. यातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद हीच पालकमंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांची खरी पुण्याई आहे.

        स्वागत  नंदकिशोर खराडे, प्रास्ताविक राष्ट्रवादी चे मुरगूड शहर अध्यक्ष रणजित सुर्यवंशी यांनी केले
यावेळी नामदेवराव मेंडके, डॉ सुनिल चौगले, एस व्ही चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शामराव घाटगे, पांडुरंग  कुडवे, आनंदा गोधडे, नामदेव भांदीगरे, उत्तम कापशे, व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, सुहास खराडे , दत्तात्रय मंडलिक, राजू आमते, दिगंबर परीट , अमर देवळे,आमित पाटील, शाहू फर्नांडिस, राजाराम गोधडे, विक्रांत घाटगे आदी मान्यवरांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले .आभार सुनिल चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *