बातमी

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानेश्वरी आरभावे राज्यात तिसरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील अजिंक्य अकॅडमीच्या कु . ज्ञानेश्वरी संदीप आरभावे ( २ री ) हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 100 पैकी 96 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.

            तसेच कु. आर्यन संदीप पाटील (२ री ) याने 100 पैकी 94 गुण मिळवित केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला . तर कु .प्रांजल सुरज इंगवले ( ३ री ) हिने 200 पैकी 190 गुण मिळवीत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला . तसेच कु.शिवम प्रकाश बिराडे ( २ री ) याने 100 पैकी 78 गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले.  

             या विद्यार्थ्यांना अजिंक्य अकॅडमीच्या शिक्षिका सौ सरीता  रणवरे  यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तर सौ. गीता होडगे व सौ सिंधू कोंडेकर या शिक्षिकेचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *