बातमी

वळवाच्या पहिल्या पावसाने मुरगडकराना दिलासा

गुरुवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसराला वळवाच्या पहिल्या पावसाने विजेच्या गडगडा सह गुरुवारी रात्री हजेरी लावली. दिवसभर उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने गारवा मिळाला.

 

गेल्या काही दिवसापासून उष्णता वाढल्याने नागरिक हैराण झाले होते . गुरुवारी रात्री दहा नंतर अचानक वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडासह पावसाने सुरुवात केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुरगूड व परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *