मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरगूडमधील राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी जगदिश सावर्डेकर हीची १ /५ / २०२३ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अशियन पॉवर लिप्टींग स्पर्धैमध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेकडून कु . जान्हवीचे वडील श्री. जगदिश सावर्डेकर यांच्याकडे ५००० रु. चा धनादेश सुपुर्द केला. कु. जान्हवी सरावामध्ये व्यस्त असल्याने ती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तिच्या वडिलानां बोलावून श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात हा धनादेश चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
याप्रसंगी व्हा. चेअरमन सौ. रोहिनी तांबट, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, किशोर पोतदार, हाजी धोंडीराम मकानदार, प्रदिप वेसणेकर, यशवंत परीट, संदिप कांबळे, प्रकाश सणगर, महादेव तांबट, सुरेश जाधव, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , कर्मचारी वर्ग उपस्थित होता.