कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील करनूर येथील ग्रामदैवत मर्यायी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठी अजय निकम शाहूपुरी तालीम व पैलवान प्रवीण कुमार गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्यात खडाखडी झाली. घटना डावावर पैलवान प्रवीण कुमार यास चित्रपट करीत पैलवान अजय निकम याने करणार केसरीचे चांदीची गदा मिळवत विजेता ठरला.
या कुस्ती स्पर्धेत पैलवान प्रवीण कुमार हा उपविजेता ठरला. अनुक्रमे इंद्रजीत मोळे (गंगावेस), लिंगावत सोनवने, अक्षय तांबे व प्रशांत पाटील ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. यांनी डोळ्याची पाळणे फेडणारे कुस्त्या केल्या.
इम्रान नायकवडी, धनराज घाटगे, बाळासो पाटील (मनसे), तातोबा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अझरुद्दीन शेख, यांच्या हस्ते आखाडा पुजन झाले. सुमारे दीडशेहून अधिक लहान-मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.