मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड ता . कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा . डॉ . पी . एस कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या विचारांचे मंथन करत असताना ते म्हणाले की आज आपण सर्वजणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पारखे झाले आहोत.
त्यांच्या ध्येय धोरणानुसार आपल्या देशाने वाटचाल केली असती तर आज वेगळे चित्र दिसले असते . तथापि राज्यकर्ते व आपण सर्वांनी त्यांच्या विचाराकडे पाठ फिरवल्यामुळे आज आपल्याला अंधारात चाचपडतल्या सारखे चालावे लागत आहे.
बाबासाहेबांनी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा मोलाचा ठसा उमटवला आहे . शैक्षणिक सामाजिक आर्थिक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे .त्याचा आपण विसर पडता कामा नये.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार सर होते त्यांनी आपले विचार मांडताना त_म्हणाले की डॉक्टर आंबेडकरांचे कार्य इतके महान आहे की त्यांना जरी पाच नोवेल पारितोषिक दिली असती तरी त्या नोबेल पारितोषकांचा सन्मानच झाला असता.
पण दुर्दैवाने त्यांना नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले नाही ही एक खंत आहे. सदरचा कार्यक्रम हा महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केला होता . यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा . डॉ .पी .आर. फराकटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी संतोष कांबळे यांनी आंबेडकरांच्या जीवनावर गीते सादर करून कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली .यावेळी प्राध्यापक डॉक्टर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक शिवाजी पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रचंड प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमात प्राध्यापक दादासाहेब सरदेशाई यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर प्राध्यापक सौ .ए.के कांबळे यांनी सूत्रसंचालन केले . कार्यक्रमास प्राध्यापक एच .एम. सोहनी, प्राध्यापक व्ही . ए .प्रधान ,व्ही . ए .कांबळे ,प्राध्यापक सौ .शीतल मोरबाळे, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव होडगे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक आर .आर. पाटील यांनी मानले .