कृषी

शेवगा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवडीसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्थी –

फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना लाभ द्यावयाचा आहे. अर्जदाराकडे स्वमालकीची कमीत-कमी १० गुंठे जमीन आवश्यक असून योजनेचा लाभ एका व्यक्तीसाठी अधिकतम १ हेक्टरसाठी पात्र असेल. वैरणीकरीता शेवगा लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रासाठी ७५० ग्रॅम शेवगा बियाणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडून पुरवठा करण्यात येईल.

लाभार्थीस १० गुंठ्यासाठी 3 हजार रुपये अनुदान देय असून त्यामध्ये ६७५/- रुपये किंमतीचे बियाणे पुराविण्यात येईल व उर्वरित २ हजार ३२५ रुपयामध्ये (खते, किटकनाशके, मशागत खर्च, इतर अनुषंगिक खर्च) बाबींचा समावेश असेल. २ हजार ३२५ रुपये अनुदानाची रक्कम लाभार्थीस १ हजार १६२.५ रुपयांच्या दोन समान हप्त्यात बँक खात्यात डी.बी. टी. द्वारे रक्कम रुपये जमा करण्यात येईल. अनुदानाचा पहिला हप्ता बियाणाची लागवड केल्यानंतर व दुसरा हप्ता लागवडीनंतर एक वर्षाने देय असेल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2662782 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *