बातमी

कार्यकर्त्यांच्या बाबतीत तडजोड नाही : संजयबाबा घाटगे

केनवडेत विविध संस्थांतील विजयी उमेदवारांचा सत्कार

व्हनाळी(वार्ताहर) : सत्ता, साधने नसतांना अनेक राजकीय वादळी लढ्यात कार्यकर्त्यांनी साथ दिली. कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबत कोणतीच तडजोड करणार नाही. आम्ही गोकूळ दूध संघात प्रतिनिधीत्व करत असताना गोकुळने आमच्या विरोधात काम केले. नेत्यांवर आम्ही प्रेम, आदर व निष्ठेने त्यांच्या सोबत राहीलो पण लाचारी पत्करली नाही. म्हणूनच पी.एन.पाटील वगळता जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याने निवडणूकीसाठी राजकिय मदत केली नाही. यापुढे स्वतः निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असला तरी कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणतीच तडजोड करणार नाही. असा ठाम विश्वास माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्त केला.

केनवडे (ता.कागल) येथे श्री आन्नपुर्णा साखर कारखान्यावर आयोजित विविध संस्थांच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी बेलवळे, सोनाळी, सावर्डे, गोरंबे, पिराचीवाडी, तमनाकवाडा, साके. केनवडे योथील विविध विकास संस्थांच्या नुतन संचालकांचा कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्ञानदेव जाधव, दिनकराव कोतेकर, तालुकाप्रमुख अशोकराव पाटील, उमाजी पाटील, एन.एस.चौगले, आकाराम बचाटे, संजय चिंदगे, इंद्रजीत पाटील, एम.एस.पाटील, शिवाजी तिप्पे, अमर भोसले, ज्ञानदेव पाटील, किरण पाटील, अशोक पाटील, बाजीराव पाटील, विष्णूपंत गायकवाड, शंकर सांवत, दता पाटील, दत्ता दंडवते, साताप्पा तांबेकर, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
स्वागत सौ. पुनम चव्हाण यांनी केले. आभार सचिव तानाजी कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *