बातमी

मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे नाहीतर तिव्र आंदोलन करु – मा. उपनगराध्यक्ष दगडू शेणवी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे वकिलांनी विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कागल तालुका युवाअध्यक्ष दगडू शेणवी दिला. ते म्हणाले कागल तालुक्यातील 85 गावांपैकी 58 गावे भौगोलिक दृष्ट्या मुरगुड शहरांशी मध्यवर्ती ठिकाण म्हणून संलग्न आहेत. पक्षकारांना कागलला जाण्या येण्या च्या गैरसोयी होत आहेत त्यामुळे मुरगुड येथे दिवाणी न्यायालय व्हावे पण कागल तालुक्यातील मोजक्याच वकिलाकडून विरोध होत आहे.

25 वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू होते आता त्यातच कागलच्या स्थानिक वकिलांनी वैयक्तिक हितासाठी विरोध दर्शविला आहे. तो विरोध स्वार्थी आहे असे दगडू शेणवी यानीआपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके , एस. व्हि. चौगुले ,जयसिंग भोसले , व्यापारी नागरी सह .पतस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, दिगंबर परीट, अमर चौगुले, राजू चव्हाण, विनोद निकम, कुणाल क्षिरसागर, पांडुरंग कुडवे आदी उपस्थित होते. निवेदनावर 500 नागरिकांच्या सह्या आहेत त्या मुळे शासनाने याची दखल घ्यावी.

One Reply to “मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे नाहीतर तिव्र आंदोलन करु – मा. उपनगराध्यक्ष दगडू शेणवी

  1. I loved you better than you would ever be able to express here. The picture is beautiful, and your wording is elegant; nonetheless, you read it in a short amount of time. I believe that you ought to give it another shot in the near future. If you make sure that this trek is safe, I will most likely try to do that again and again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *