बातमी

कुरणी येथे महाराष्ट्र अंनिसचे ‘विधवा अवमान प्रथा’ विरोधात लोक जागर अभियान संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : विधवा महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय महिला समूहाचे मानसिक खच्चीकरण आहे. देशातील पन्नास टक्के महिलांना प्रवाहातून वंचित ठेवल्यामुळे अर्धा देश अधोगतीत लोटणे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने “विधवा अवमान प्रथा बंदी”चे विधेयक संमत करावे व हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू करावा अशी मागणी शाश्वत विकास चळवळ या संस्थेचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केली.

विधवा महिलांचे मानसिक खच्चीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय महिला समूहाचे मानसिक खच्चीकरण आहे. देशातील पन्नास टक्के महिलांना प्रवाहातून वंचित ठेवल्यामुळे अर्धा देश अधोगतीत लोटणे. महाराष्ट्र शासनाचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने “विधवा अवमान प्रथा बंदी”चे विधेयक संमत करावे व हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू करावा अशी मागणी शाश्वत विकास चळवळ या संस्थेचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केली. कुरणी ता. कागल येथे “विधवा अवमान प्रथा बंदी” ठरावा संदर्भात लोक जागृती अभियान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने व समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेच्या प्रयत्नातून राबवण्यात आले.सुसंवाद सभेत व्यापक चर्चा करण्यात आली.या प्रसंगी डॉ अर्जुन कुंभार प्रमुख वक्ते बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सदाशिव गणपती पावले होते.

विधवांचा अवमान म्हणजे समस्त भारतीय स्त्रियांची प्रतारणा – डॉ. अर्जुन कुंभार

डॉ कुंभार म्हणाले,”आपली कृषी संस्कृती मातीत रुजलेली आणि रक्तात भिनलेली आहे. या संस्कृतीत विधवा अवमान प्रथेस थारा नाही.ही कुप्रथा बाहेरील राज्यातून आपल्या कडे आली. मराठी समूहात अशी प्रथा नव्हती.पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 165 वर्षांपूर्वी आपल्या मुलाचा विधवेशी पुनर्विवाह करून दिला त्यानंतर 1919 साली शाहू महाराज यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करवीर संस्थानामध्ये केला. तरीही आजची भारतातील विधवांची स्थिती भयावह आहे.चार कोटी अकाली विधवा मुली,स्त्रिया प्रतारित जीवन जगत आहेत.भारतातील जाती पंचायती धर्म संस्था पक्षपाती व दुराग्रही आहेत. संविधानाने मात्र हा दुराग्रह पक्षपात मोडून काढला आणि सर्वांना समान पातळीवर आणले. भारतीय संविधानाचा सन्मान करूया विधवा अवमान प्रथा हद्दपार करूया.” असे आवाहन त्यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविक अंनिसचे प्रधान सचिव समीर कटके यांनी केले. विधवा अवमान प्रथा बंदी संदर्भात शाश्वत विकास चळवळीने राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था विविध समाजसेवी संस्था प्रबोधन चळवळीतील संघटना यांच्यासाठी जाहीर केलेल्या मसुद्याचे वाचन प्रा डॉ टी एम पाटील यांनी केले.कुरणी ग्रामपंचायतीने या संदर्भात केलेल्या ठरावाचे वाचन पी डी रणदिवे यांनी केले.

दलितमित्र डी.डी. चौगुले, एस.आर.बाईत,कुरणीच्या ग्रा.प. सदस्य अनिता जत्राटे, जयश्री कोरे, प्राजक्ता कांबळे, अरुण सुतार, पोलीस पाटील सविता शिंदे यांच्यासह सुरुपलीचे सरपंच अनिल कांबळे, उपसरपंच बाळासो मोरे, साताप्पा कांबळे, विद्या मंदिर कुरणीचे मुख्याध्यापक नारायण कल्याणकर,श्रीकांत गायकवाड संतोष मेळवंकी, प्रा. ए.एम.कोळी,अंनिसचे कार्याध्यक्ष भीमराव कांबळे,विकास सावंत,सारिका पाटील,विक्रमसिंह पाटील, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास सावंत यांनी तर आभार सरपंच सिद्धगोंड पाटील यांनी मानले.

शाश्वत विकास चळवळीने जाहीर केलेल्या मसुद्यातील काही महत्त्वाच्या बाबी

1 विधवा आव्हान प्रथा बंदी बाबत लोक भुमिका तयार करण्यासाठी प्रबोधनाची यंत्रणा हवी
2 विधवा कुप्रथा ऐवजी विधवा अवमान प्रथा बंदी असा उल्लेख करावा
3 “विधवा” शब्द अवमान दर्शक असल्यामुळे त्याला पर्यायी शब्द शोधावा.
4 अंत्यविधी समयी विधवा स्त्रियांना दिली जाणारी वागणूक त्यांच्या आत्म्याचा खून करणारी आहे. तिला अपशकुनी पांढऱ्या पायाची असेही लिहून खच्चीकरण करण्याची वारसाहक्क नाकारण्याची पुनर्विवाहाला बंदी घालण्याची प्रथा बंद करणे आवश्यक आहे
5 विधवांना दिले जाणारे 15000 शासकीय अनुदान सोबत त्यांना व्यवसाय नोकरीमध्ये उभारण्यासाठी समाजातून मदत केली जावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *