वाघापुर (जोतीराम पोवार ) : वाघापुर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव त्रैवार्षिक “जळ” यात्रेचा शुभारंभ उद्या शनिवार रोजी होत असून रात्री नऊ वाजता पालखी सबीनासह नदीकाठावरील विठ्ठल-बिरदेव मंदिराकडे पालखी प्रस्थान व रविवार दि. 27 रोजी सकाळी बरकाळे बंधू यांच्या आंबील नैवेध रात्री कुंभारवाड्यातील कुंभार बंधू यांच्या घरी कर पूजनानंतर, वालंग, हेडाम खेळ तसेच नदीवरील विधिवत पूजनानंतर दूध उतू जाणे, दाताने बकरे तोडण्याचा विधीवत कार्यक्रम होईल, सोमवार दि.28 रोजी सकाळी सर्व गावाचा आंबील महानैवेद्य होईल
सायंकाळी चार वाजता पालखी सबीनासह भाकणूक होईल मंगळवार दिनांक 29 रोजी सायंकाळी चार वाजता पालखी सबीनासह भाकणूक व रात्री जागर बुधवार दि 30 रोजी म्हाई होणार असल्याचे सरपंच सौ. जयश्री दिलीप कुरडे यांनी साप्ताहिक गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केले दरम्यान यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिर व परिसरातील स्वच्छता, हायमाष्ट दिवे व येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध केली असल्याचेही त्यांनी सांगितले