व्हनाळी(सागर लोहार) : साके ता. कागल येथील असणा-या स्मशनशेड (वैकुंठभूमी) दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आसून आद्याप संबधीत ग्रामपंचायतीने दुरूस्ती केलेली नाही. शासनाच्यावतीने दर वर्षी स्मशानशेड दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होत असून देखील गेल्या वर्षेभरात सदर स्मशानशेडची दुरूस्ती केलेली नाही. शेडचे पत्रे पुर्णपणे खराब झाल्याने पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार कराचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
संबधीत ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे. या स्मशानशेडच्या दुरूस्तीसाठी जि. प. सदस्य मनोज फराकटे यांनी दोन लाख रूपये निधी देण्याचे आश्वासन दिले होते पण कांही मंडळींनी त्याला विरोध केल्याने तो निधी पर गेला व काम इतर फंडातून सुरू केले तरीदेखी ते अर्धवटच राहिल्याने ग्रामपंचायतीच्या या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निमार्ण झाले आहे.
पावसाळा सुरू होण्यापुर्वी स्मशानशेड चे खराब झालेले लोखंडी पत्रे बदलावेत व समोरील कांपाउंड भिंत गेटचे काम तसेच आतील फरशी व आतील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडून परिसर स्वच्छता व्हावी. तसेच स्मशेनशेड परिसरात लाईट ची व्यवस्था करावी. अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. बाचणी, पिराचीवाडी येथील स्मशेनशेड अलिशान होतात मग साके गावालाच निधी का मिळत नाही काम अर्धवट का राहिले आहे याबाबत संबधीत विभागाने चैाकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.