बातमी

अहिल्यादेवी होळकर राष्ट्रवीरांगना – युवा लेखक साथी उमेश सूर्यवंशी

कागल(विक्रांत कोरे): अहिल्यादेवी होळकर या राष्ट्राच्या नायिका आहेत. त्यांचे कार्य क्रांतिकारक आहे. त्यांना धार्मिकतेत न ठेवता त्यांचे कार्य व त्यांचा खरा इतिहास देशभर पसरवला पाहिजे, असे प्रतिपादन युवा लेखक व इतिहास अभ्यासक साथी उमेश सूर्यवंशी यांनी केले.

करनूर ता. कागल येथे बिरदेव तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानात राष्ट्र नायिका अहिल्यादेवी होळकर या विषयावर ते बोलत होते.


सूर्यवंशी पुढे म्हणाले, अहिल्यादेवींची 2025 साली होणारी 300 वी जयंती मोठ्या स्वरूपात व्हावी व त्यांचा खरा इतिहास देशभर पसरवावा. त्या भारताच्या नायिका आहेत. 70 वर्ष त्या राहिल्या त्यातील त्यांनी 29 वर्ष नेतृत्व केलं. त्यांचे सासरे मल्हाराव होळकरांच्या तलवारीने ही मराठी शाही पताका कायम ठेवली.

ते म्हणाले, प्रत्येक गावाच्या वेशीवर राष्ट्र नायिका अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा असावा. त्यांनी सहा पेशवाई कारकीर्द त्यांच्या समोर घडले आहेत. अहिल्यादेवी अत्यंत हुशार होत्या. त्यांनी मल्हाररावांच्या कडून रणांगना चे धडे शिकले होते.अहिल्यादेवी या सतराव्या शतकात हुंडा बंदी व विधवांना सन्मान देणारी पहिली स्त्री आहे. त्यांनी मावळ प्रांतात स्त्रियांचा सन्मान करून ,महिलांना लष्करामध्ये आणण्यासाठी फलटण तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणारी पहिली महिला आहे. अहिल्यादेवी होळकर या धर्म नायिका का राष्ट्र नायिका हे तुम्ही त्यांचे कार्य व इतिहास समजून घेऊन लक्षात घ्या असेही ते म्हणाले.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान,रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसह 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. वैभव लक्ष्मी ब्लड बँक ,कोल्हापूर यांनी रक्त संकलन केले. तसेच राजे फाउंडेशन च्या वतीने मोफत ई- श्रम कार्ड शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत सचिन घोरपडे यांनी केले.सूत्रसंचालन हरी आवळे यांनी केले. कार्यक्रमास जयसिंग घाटगे, समीर शेख, वैभव आडके, बाळासो धनगर, लक्ष्मण भंडारे, सिद्धू बेळेकर, सौ. कविता घाटगे, सौ. अश्विनी चौगुले, सौ. संगीता जगदाळे, सौ. रेश्मा शेख, तानाजी भोसले, रोहन पाटील, तानाजी धनगर आदींसह. बिरदेव तरुण मंडळातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य सतीश धनगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *