बातमी

समाजासाठी झटणाऱ्या लोकांचा गौरव व्हावा – संजयबाबा घाटगे

बाचणी येथे विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ

व्हनाळी – वार्ताहर :समाजपयोगी माणसे ही त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे नावारूपास आलेली असतात. त्यांच्यामुळेच समाजामध्ये कांहीतरी चांगले घडत असते. समाजाने ही अशी माणसे हेरून त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या उंचीएवढा गौरव करायला हवा. असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगरचे अध्यक्ष, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.

बाचणी (ता. कागल) येथे सरवडेच्या किसनराव मोरे प्रशालेचे आदर्श शिक्षक टी. एम. सरदेसाई व ‘गोकुळ’ च्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल विजयसिंह मोरे यांच्या संयुक्त सत्कारप्रसंगी बोलत होते.

श्री मोरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी आत्मसात ज्ञान कौशल्याचा उपयोग करायला हवा. कलाशिक्षक टी. एम. सरदेसाई यांच्याकडे उपजतच कलाकौशल्य आहेत. त्यामुळे त्यांनी सेवाकाळात लेखन, कला, व सांस्कृतिक असे चांगले उपक्रम राबविले. म्हणून मोरे विद्यालय ही उपक्रमशिल शाळा उदयास आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कलाशिक्षक टी. एम. सरदेसाई व त्यांच्या पत्नी सौ. गीता सरदेसाई यांचा तर ‘गोकुळ’ चे संचालक विजयसिंह मोरे यांचा सत्कार माजी आमदार संजयबाबा घाटगे, ‘बिद्री’ चे संचालक गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रियांका मगदूम, प्राचार्य पी. एस. पाटील, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब पाटील,माजी जि.प.सदस्य नानासाहेब कांबळे, संभाजीराव देसाई, बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमास बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार, के. पी. पाटील, एम. पी. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रवि सरदेसाई, जि.प.सदस्य मनोज फराकटे, संजय पाटील आर. के. पाटील, धनाजीराव बाचणकर, रघुनाथ कुंभार, बाळासाहेब तुरंबे,मा.सरपंच निवासराव पाटील, सरपंच इकबाल नायकवडी उपस्थीत होते. प्रास्ताविक उत्तम पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अतुल कुंभार व व्ही. आर. सडोलकर यांनी केले. तर आभार रमेश कांबळे यांनी मानले.
……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *