संपूर्ण सरवडे गावात शोभायात्रेचा कौतूकाचा व चर्चेचा विषय
मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता . राधानगरी येथिल ” जिज्ञासा प्री -प्राइमरी ” स्कूलमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठया उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
राममंदिर प्राणप्रतिष्ठा पौष शुल्क व्दादशी शके १९४५या शुभदिवशी आयोध्यामध्ये मोठया भक्तीमय वातावरणात साजरा झाला . रामजन्मभूमिवर असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात श्रीरामाच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते हा भव्यदिव्य असा सोहळा साजरा झाला . सोमवारी संपूर्ण देशात हा सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
सरवडे येथील जिज्ञासा प्री -प्राइमरी स्कूलच्या बालचमूनी शोभायात्रेत रामायणातील राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, यांच्यासह अनेक पात्रांच्या विविध वेशभुषा केल्या होत्या . ही शोभायात्रा शाळेपासून सरवडे गावच्या हनुमान मंदिराच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली . ही शोभायात्रा काढल्याने संपूर्ण सरवडे गावात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.
या शोभायात्रेत मुख्याध्यापिका सौ. दिपाली बाबासाहेब रेपे, पर्यवेक्षिका सौ. विद्याताई राकेश फराकटे , शिक्षिका सौ . भाग्यश्री कांबळे, सौ. दिपाली कांबळे, कु. तेजश्विनी रेपे, मदतनीस सौ. सविता कांबळे, सौ. राधाताई कांबळे यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले.