बातमी

काय तक्रार केली किरीट सोमय्यांनी मंत्री मुश्रीफांवर पोलिस स्थानकामध्ये ; पहा बातमी


मुरगुड : भाजप खासदार किरीट सोमय्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांवर तक्रार दाखल केली आहे. मुश्रीफ यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करुन १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ व परिवारावर सरसेनापती संतांजी घोरपडे साखर कारखाना, तसेच आप्पासाहेब नलावडे गडहिंग्‍लज सहकारी साखर कारखाना लिमिटेड घोटाळासंबंधी तक्रार मुरगूड पोलिसात दाखल केली आहे.


मुरगूड पोलिस स्थानकात दिलेल्‍या तक्रारीतील मुद्‍दे
•सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात मोठ्या प्रमाणात मनी लँड्रिंग, फसवणूक, बेनामी पद्धतीने ९८% भाग भांडवल आणले.
अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात स्वतःच्या जावयाद्वारे ९७ टक्‍के पैसा हा भ्रष्टाचाराचा, फसवणुकीचा काळा पैसा शेल कंपन्यांद्वारा आणला

•सरकारी कंत्राटमध्ये, टेंडर पद्धतीत फसवणूक, फोर्जरी, बनावटी कागद, पुरावेद्वारा शेकडो कोटी कंत्राट स्वत:च्या कंपनीला मिळवून देणे.

•ज्या कंपन्या बंदा झाल्या आहेत त्यांची फोर्जरी करून फसवणुकीने बँक व्यवहार केले. याद्वारा भ्रष्टाचाराचा कोट्यवधी रुपयांचा पैसा अशा बंद कंपन्यामध्ये वळवून स्वतःच्या/परिवाराच्या खात्यामध्ये वळवला.

•स्ट्राइक ऑफ कंपनीच्या नावाने बँक खाते उघडणे, बँकेचे व्यवहार करणे हा भारतीय सहिता (IPC) च्या अंतर्गत फसवणूक, फोर्जरी, फ्रॉड असल्‍याचेही तक्रारीत म्‍हटले आहे.

•ज्या कंपन्यांना भारत सरकारने शेल कंपन्या म्हणून घोषित केल्या आहेत, त्यांचे व्यवहार थांबवले अशा बेनामी, शेल कंपन्यांद्वारा कोट्यावधी रुपये सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना व आपल्या मित्र परिवार खात्यात आणल्याची तक्रार (FIR) दाखल करावी, चौकशी व्हावी व कारवाई व्हावी. अशी आमची मागणी असल्याचेही माजी खासदार किरीट सोमय्यांनी या तक्रार अर्जात केली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप, त्यावर मुश्रीफ यांनी १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा दिलेला इशारा दिला आहे त्याचबरोबर सोमय्या यांच्याविरोधात मंत्री मुश्रीफ समर्थकांनी निदर्शने केली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *