लेख

जागतिक युवा पंधरवडा

स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवा दिन

भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिन हा भारतातील तरुणांना समर्पित केलेला एक विशेष दिवस आहे, ज्यांच्याकडे देशाचे भविष्य चांगले आणि निरोगी बनवण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंदांचा तरुणांशी काय संबंध, त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून का साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद कोण आहेत आणि देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान काय आहे? स्वामी विवेकानंदांबद्दल सर्व काही जाणून घेवूया आणि त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याचे कारण आणि इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.

स्वामी विवेकानंद कोण होते ?

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. अभ्यासात चांगले असूनही, जेव्हा ते 25 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या गुरूंच्या प्रभावाने नरेंद्रनाथ यांनी संसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते सन्यासी झाले. निवृत्तीनंतर त्यांचे नाव विवेकानंद ठेवण्यात आले. 1881 मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली.

स्वामी विवेकानंदांबद्दल रोचक तथ्ये

स्वामी विवेकानंद अनेकदा लोकांना प्रश्न विचारायचे, तुम्ही देव पाहिला का? याचे योग्य उत्तर कोणालाच मिळालेले नाही. एकदा त्यांनी हाच प्रश्न रामकृष्ण परमहंसांना विचारला होता, ज्यावर रामकृष्ण परमहंसजींनी उत्तर दिले, होय मला देव तेवढेच स्पष्ट दिसत आहे, जेवढे तुम्ही दिसत आहात, परंतु मी त्याला तुमच्यापेक्षा अधिक खोलवर अनुभवू शकतो.

स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याच वेळी 1898 मध्ये गंगा नदीच्या काठावर बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली.
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेत धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्वामी विवेकानंद यांनीही सहभाग घेतला होता. येथे त्यांनी हिंदीत ‘अमेरिकेचे भाऊ आणि बहिणी’ असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. शिकागोच्या आर्ट इन्स्टिट्युटमध्ये पूर्ण दोन मिनिटे त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्याची भारताच्या इतिहासात अभिमानाची आणि सन्मानाची घटना म्हणून नोंद झाली.

स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी युवा दिन का साजरा केला जातो ?

स्वामी विवेकानंदांना अष्टपैलू म्हणतात. ते धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, कला, समाजशास्त्र, साहित्य यांचे जाणकार होते. शिक्षणात चांगले असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. याशिवाय विवेकानंदजीही चांगले खेळाडू होते. ते तरुणांसाठी प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. अनेक प्रसंगी त्यांनी आपल्या अनमोल विचारांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. म्हणूनच स्वामी विवेकानंद जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिन कधी आणि कसा सुरू झाला

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस तरुणांना समर्पित करण्याची सुरुवात 1984 पासून झाली. त्या दिवसात भारत सरकारने म्हटले होते की, स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान, आदर्श आणि कार्यपद्धती भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरु शकते. तेव्हापासून स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय युवा दिवस हा 12 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो. UN कडून पहिल्यांदा 2000 साली त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. जगभरात तरूणाईला सामोरं जावं लागणाऱ्या सांस्कृतिक आणि कायदेशीर गोष्टींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने तरुणाईला सामोरे जावे लागणाऱ्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा दिवस आहे.

तरुण मंडळी ही देशाचं भवितव्य असतात. त्यामुळे तरुणाई कोणत्या दिशेने प्रवास करत आहे यावरच देशाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे तरुण मंडळींकडे दुर्लक्ष करु नका. “
जागतिक चळवळीत सहभागासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन
प्रत्येक देशाचे भविष्य हे त्या देशाच्या युवकांच्या हाती असते. आज तयार होणाऱ्या रचनेचे पालन करुन हे तरुण ज्या दिशेने काम करतात त्याच दिशेने देशाची वाटचाल होत असते. संयुक्त राष्ट्रांनी जागृती दिन म्हणून स्थापन केलेल्या ‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’ मध्ये युवकांच्या आजुबाजुला घडणाऱ्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा हेतू असतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने युवकांशी निगडीत असणाऱ्या अनेक मुद्यांवर, घटकांवर आणि भविष्यातील आव्हांनावर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षीचे घोषवाक्य ‘जागतिक चळवळींसाठी युवकांचा सहभाग (Youth Engagement for Global Action) असे निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील तरुणांचा सहभाग हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये वाढावा तसेच, युवकांचे प्रतिनिधित्व आणि गुंतवणूक ही संस्थातत्मक राजकाराणासाठी कशी पुढे नेता येईल याचे धडे अशा मुद्दयांवर घोषवाक्य भर देते.

युवकांचा स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक संस्थांमध्ये अधिक समावेश करुन जागतिक पातळीवरील आव्हाने साध्य करण्यासाठी त्यांना अधिक सक्षम करणे हा यावर्षीचा मानस आहे. आंततराष्ट्रीय स्तरावर आणि वाढत्या ध्रुवीय जगाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शासन प्रणाली सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीची क्षमता बळकट करण्यासाठी युवकांना पुढाकार घेणे गरजेचे आहे. दहशतवाद, आपत्कालीन परिस्थिती, हवामान बदल आणि असे अनेक मुद्दे हेच तरुण पिढीचे लक्ष्य आहे. येणाऱ्या काळ तंत्रज्ञानासोबतच दुप्पट आव्हाने घेऊन येणारा आहे आणि त्याचे पडसाद आतापासूनच पाहायला मिळतात.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे तसेच हवामान बदलांमुळे एकुणच मानवतेला सध्या अनेक आव्हानांना तोंड देण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रभावशाली ठोस जागतिक कृती, अर्थपूर्ण गुंतवणूक आणि तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल.

आजची तरुण पिढी ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रयोगाच्या विश्वात वावरणारी आहे. विज्ञान -तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मानवी मूल्ये आणि विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. शिवाय त्याविषयीची मागणी करण्यासाठी ही पिढी सतत सक्रिय असते. युवकांच्या या क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची जोड देऊन नक्कीच बदल घडवता येईल. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

प्राचार्या,
आरोग्य व कुटूंब कल्याण,
प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *