मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात प्रजापिता ब्रम्हाकुमारी शाखा मुरगूड यांच्या वतीने जेष्ठासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी . मगदूम यानी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे अध्यक्ष श्री . गजानन गंगापूरे यानी प्रास्ताविक करुन बहीण भावाच्या अतूट पवित्र नात्याचे महत्त्व सांगितले.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी शाखा मुरगूडच्या प्रमुख श्रीमती लता बहेनजी यानीं राखी पौर्णिमेच्या पौराणिक , ऐतिहासिक सणाबाबत विस्तारितपणे माहिती देऊन बहीण भावाच्या नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा स्पष्ट होते. मनांतील वाईट विचार, विकार यानां तिलांजली देऊन शुद्ध व चांगले विचार वृध्दिगत करणेची गरज असल्याची भावनां त्यानीं यावेळी व्यक्त केली.
या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी संघाचे संचालक -सदस्य, श्री. एस. व्ही. चौगले, श्री. किरण गवाणकर, महादेवराव साळोखे यांच्यासह जेष्ठ नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते . सर्वानां श्रीमती लता बहेनजीनीं राख्या बांधून खाऊ वाटप केला. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक श्री. जयवंत हावळ यानी सर्वांचे आभार मानले.