बातमी

स्लॅपवरून पडून कामगाराचा मृत्यू

कागल(विक्रांत कोरे) : बांधकामाच्या स्लॅपवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडेअकरा वाजता कागल येथील येशीला पार्कमध्ये घडली. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार कागल येथील येशीला पार्कमध्ये योगेश व्यवहारे यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. सकाळी 11:30 वाजता इस्माईल मियालाल कलावंत, वय -वर्षे 40 राहणार- कसबा सांगाव, तालुका कागल याचा तोल गेला. तो खाली जमिनीवर पडला.

गंभीर जखमी झाल्याने त्यास कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास हवालदार पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *