सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास
सिद्धनेर्ली : गोरबे (ता. कागल) येथील जय भवानी विकास सेवा संस्था व श्री गुरुकृपा सहकारी दूध संस्था या दोन्ही संस्थांमध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री गुरुकृपा दूध संस्था व जय भवानी विकास सेवा संस्थेच्या दोन्ही इमारती जवळजवळ आहेत.
चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री संस्थेच्या समोरील दरवाजांचे कुलूप तोडून तिजोरीत असणारी रोकड लंपास केली आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दूध संकलनासाठी कर्मचारी गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.