बातमी

मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात क्रांती दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयामध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. प्रथम क्रांतीकारांच्या प्रतिमेचे पूजन श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री किरण गवाणकर व संतोष खराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून क्रांतीकारानां श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी वाचनालयाचे सचिव एस व्ही चौगले म्हणाले ९ ऑगष्ट १९४२ रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ” भारत छोडो ” आंदोलनाने ब्रिटीश राजवटीची पाळेमुळे हादरली . या “भारत छोडो ” आंदोलनात ज्यानी प्राण गमावले त्यामुळे ९ ऑगष्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी क्रांती दिनाच्या प्रसंगी श्री. संतोष खराडे, पत्रकार शशी दरेकर, अशोक ताशिलदार, वासुदेव चौगले , रामचंद्र कांबळे, सुरेश दरेकर, सदाशिव यादव, प्रशांत कोळी, सुधाकर वडर, संदिप वरपे, सौ. रेखा भारमल, सौ. शुभांगी वंडकर, वाचनालयाचे सभासद, वाचकवर्ग, सदस्य व जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *