बातमी

छ. शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य बाजारपेठेत विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल बाजारपेठेमध्ये शिवप्रेमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दि .१९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मा . श्री . अॅड सुधिर सावर्डेकर ( वकील ) यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मा. श्री. राहुल शिंदे ( कार्यकारी संचालक गणेश नागरी सह .पतसंस्था मुरगूड ) व मा. सौ. अनिता जयशिंग भोसले ( माजी नगरसेविका मुरगूड नगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
तसेच ” मराठा पातशाह छत्रपती शिवाजी महाराज ” मा . सोनल पृथ्वीराज भुते यांचे व्याख्यान होणार असुन

श्री. बाबासाहेब नदाफ, शाहू फर्नांडिस, पांडूरंग कुडवे ( रि .पी.एसआय ), महादेव तांबट, भरत मांगोरे, सौ. विमल कांबळे, सौ. सुजाता श्रीकांत दरेकर, सौ. सुजाता हवालदार, सौ. डॉ. शुभा-कुलकर्णी, सौ. गीता आंगज या मान्यवरांच्या उपस्थितीत वायरमन व पोस्टमन यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. संदीप ड्रायक्लिनर बाजारपेठ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास शिवप्रेमी, नागरीकानी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *