बातमी

खाऊगल्लीतील गुदरमलेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड एस टी .बसस्थानक ते महात्मा गांधी मार्ग या मार्गावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या अनेक वर्ष झाली रस्त्यावरच अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सुप्रिम कोर्टापर्यंत वाद सुरु होता अखेर पालिकेने न्यायालयीन आदेशानुसार ही खाऊगल्ली आज अतिक्रमणमुक्त केली. त्यामूळे या गुदमरलेल्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य बाजारपेठ (महात्मा गांधी मार्ग ) ते एसटी बसस्थानक दरम्यानच्या रस्त्यावर चहा व खाद्यपदार्थ विक्रीचे खोके रस्त्यावर वसल्याने हा रस्ता वाहतूकीपासून दूरच होता . एसटी . बसस्थानकावरून शाळा व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांची मोठी वर्दळ या रस्त्याने होते . या दाटीवाटीच्या मार्गावरील वाहतुकीला निम्या रस्त्यावर आलेल्या खाऊ गल्लीमूळे अडथळा आला होता.

त्यामूळे प्रवाशी व वाहनधारकांत नाराजी होती . तर महात्मा गांधी मार्गावरील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना हा रस्ता ब्लॉक होण्याने फटका बसला होता त्यामूळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध केला .

खाऊगल्ली अतिक्रमण हटाविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने हा वाद न्यायालयात गेला . जिल्हा न्यायालय , मुंबई हायकोर्ट व सुप्रिम कोर्टपर्यंत हा वाद पोहचला अखेर सुप्रिम कोर्टाने रस्यावरील अडथळा दूर करण्याचे निर्देश दिले . पालिका प्रशासनाने न्यायालयाचा अवमान होवू नये यासाठी खोकीधारकांना नोटीस देवून १४ फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला . अन्यथा पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवले जाईल असा इशारा दिला होता अखेर खोकीधारकांनी स्वतःहून आपली खोकी काढून घेतली . त्यामूळे या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतल्याचे पहायला मिळाले .

न्यायालयीन वादानंतर का असेना रस्त्यावरील अतिक्रमणे दूर झाल्याने व वाहतूकीचा अडथळा गेल्याने वाहनधारक ‘ स्थानिक नागरिक व व्यापारी तसेच विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी याचे स्वागत केले आहे. पालिकेने आता हा रस्ता रुंदीकरणासह डांबरी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *