बातमी

मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी सह पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी १३ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारी विश्वसनिय श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता ) रविवार दि. १३ ऑगष्ट रोजी दुपारी ठिक १ वाजता श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे.

सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री . किरण गवाणकर यानी केले आहे. या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदानी वेळेवर उपस्थित राहून संस्थेवरील जिव्हाळा, आपुलकी प्रेम वृद्धिगत करावा असे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व मॅनेंजर सुदर्शन हुंडेकर यानी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *