बातमी

मुरगूडमधल्या कविसंमेलनात कवितांच्या वर्षावात-रसिक ओलेचिंब

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ व प्रदिप वर्णे वाढदिवस सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात कविसमेलन झाले. कवी एम डी रावण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसमेलनास रसिकांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला. व कवितांच्या वर्षावात रसिक ओलेचिंब झाले .

यावेळी बोलताना कवी भैरवनाथ डवरी म्हणाले ‘ सोशल मिडियाच्या युगात साहित्याकडील ओढा कमी होत आहे . पण आपल्याकडील विचार आणि संस्कारच आपल्याला तारु शकतात त्यामूळे वाचन व लेखन हे आपले अंगीकृत जीवनाचे अविभाज्य भाग आहेत . साहित्य संस्कृतीचे जतन करणे ही आज काळाची गरज बनली आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत ज्येष्ठ नागरीक संघाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वर्णे यांचा संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके दलित मित्र सर्वश्री डी.डी. चौगले , एस आर बाईत , निवृत गट शिक्षणाधिकारी पी.आर. पाटील ‘ अभियंता महादेव वाघवेकर . सिकंदर जमादार ‘ आदि प्रमुख उपस्थित होते .

प्रारंभी जयवंत गोंधळी यांनी सुमधुर आवाजात भक्तीगीत गाऊन रसिकांना भक्ती रसात चिंब चिंब भिजविले. कवी बाबुराव गुरव ( लेकीची ओढ ) ,सौ . उर्मिला पागम ( मनाचा ठेवा ), कॉं संतराम पाटील ( भावनांचा खेळ ), भरत सोनगेकर ( माझ्या बापाच्या उरातल चांदणं ), प्रा .सौ. राणी हुजरे ( आल्ल) , शिवभक्त -धोंडीराम परीट ( ती माझी बायको असते … ) ,प्रवीण सुर्यवंशी ( दुवा ) व सिकंदर जमादार (साद ) यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. तर कवी भरत सोनगेकर व प्रविण सुर्यवंशी यांनी स्वरचित कवितांचे मधूर स्वरात गायन केले. वाढदिवस सोहळा समितीचे सर्वेसर्वा प्रा. सुनिल डेळेकर ( सर ) यांनी प्रदिप वर्णे यांच्या सामाजिक कार्याचा लेखा जोखा मांडला.

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्री वर्णेही भाऊक झाले. स्वागत व प्रास्ताविक प्रा .विनय कुलकर्णी यांनी केले.
एम . टी . सामंत यांनी सूत्रसंचालन केले तर-विकास सावंत यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *