मुरगूड ( शशी दरेकर ) : राजे फाउंडेशनच्या सहकार्याने मेंदूची शस्त्रक्रिया झालेल्या कुरणी येथील संदीप मारूती पाटील याना पन्नास हजार रुपये व अनिल दिनकर पाटील यांच्या तेरा दिवसाच्या बालिकेचे योग्य ते उपचार करुनही फुफ्फुसाच्या विकाराने मृत्यू झालेने त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये असे एकूण दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झाले आहेत.

Advertisements

हा निधी मंजूर करण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला व पाटील कुटुंबीयांना भरीव निधी मिळवून दिला. सदरची रक्कम संबंधिताच्या खात्यावर नुकतीच वर्ग झाली आहे. संदीप पाटील यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून श्री घाटगे यांनी आज त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.

Advertisements

या बाबातची सविस्तर माहिती अशी ,संदीप पाटील हे घरासमोर पायरीवर बसले असताना चक्कर येऊन जमिनीवर पडले. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीटी हाँस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. याची माहिती राजे समरजितसिंह घाटगे यांना समजताच त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सांगितले. शिवाय समरजितसिंह घाटगे यांनी
या कुटुंबांला मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ५० हजार रुपयांचा फंड उपलब्ध मिळवून दिला. तसेच सिध्दीविनायक ट्रस्ट मुंबई कडूनही २५ हजार रुपये ची मदत त्यांना मिळवुन दिली.

Advertisements

तसेच कुरणी येथीलच श्री अनिल दिनकर पाटील यांच्या तेरा दिवसाच्या मुलगीच्या फुफुसातून रक्तप्रवाह होऊ लागला. यावर तातडीने राजेंनी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून साई स्पर्श हॉस्पिटल, बेलबाग, कोल्हापूर येथे तिच्यावर उपचार केले. मात्र तरीही तिचा या आजारात दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्याही वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी श्री घाटगे यांनी प्रयत्न केले. त्यानाही मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपयाची मदत तर सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई कडून 25 हजार रुपये मिळवुन दिली.

श्री घाटगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही पाटील कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. शस्त्रक्रियेनंतर खुद्द घाटगे यांनी त्यांचे घरी जाऊन श्री पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच मयत बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन श्री घाटगे यांनी केले

यावेळी माजी उपसरपंच लक्ष्मण जत्राटे, विनोद पाटील, शामराव मांगोरे, कृष्णात पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय माने, सचिन पाटील, प्रवीण पाटील, अनिल हंचनाळे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.

राजे फाउंडेशनच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत घ्या
यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना संदीप मारुती पाटील म्हणाले,नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीच्या दृष्टीने कागल येथे राजे फाउंडेशनच्या माध्यमातून राजेंनी कागल येथे स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष व सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर संचलित राजे विक्रमसिंह घाटगे हॉस्पिटल जनतेसाठी सुरू केले आहे. कोणत्याही आजारपणाचे वेळी शासकीय योजनांच्या माध्यमातून औषधोपचार व मदत मिळविण्यासाठी व योग्य उपचाराच्या मार्गदर्शनासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी व हॉस्पिटलशी नागरिकांनी संपर्क साधावा. संबंधिताना योग्य ते मार्गदर्शन व उपचार मिळतील असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!