कागल पालिकेने केलेल्या आववाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल/ प्रतिनिधी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात घरगुती गणपती बाप्पा ना निरोप देण्यात आला. गौरी विसर्जन ही करण्यात आले. गणेश मूर्ती व निर्माल्य दान करण्याच्या कागल पालिकेने केलेल्या आववाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 10 प्रभागातून पालिकेने केलेल्या 13 मुर्ती केंद्रावरून सुमारे 1695 गणेश मुर्त्या व सव्वा दोन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. आरोग्य राखण्यासाठी व पर्यावरण राखण्यासाठी कागल शहरातील दहा प्रभागात बारा ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था कागल पालिकेने केली होती. पालिकेच्या आववाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तेरा ठिकानाहून 1695 गणेश मुर्त्या व सव्वा दोन टन निर्माल्य संकलित करण्यामध्ये कागल पालिकेला यश आले.
कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार हे स्वतः प्रभागावर फिरून आवाहन करीत होते तसेच ते दूधगंगा नदीमध्ये उभारलेल्या केंद्रावर स्वतः थांबून गणेश मुर्त्या संकलित करत होते पालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, बाळासाहेब माळी, बादल कांबळे यांच्यासह पालिकेचे आरोग्य विभागाचे तसेच अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.