मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे घरगुती गौरी -गणपती विसर्जन उत्साहाचा वातावरणात पार पडले . यावेळी मुरगूड नगर परिषदेने कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती.
मुरगूड पोलिस स्टेशनचा गणराया दुपारी १२नंतर -हालगी व ताशांच्या गजरात पारंपारीक मिरणूकीने गणरायाला निरोप देण्यात आला . येथिल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा . श्री . गजानन सरगर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यानी हालगीच्या व,ताश्याच्या गजरात गणपती बाप्पाला उत्साहाच्या वातावरणात सहभाग घेऊन निरोप देण्यात आला.
याचबरोबर भोईगल्ली , परीट गल्ली,गाव भाग, व बाजारपेढेतील राजीव गांधी चौक , महाराणाप्रताप चौक , जवाहर रोड , सरपिराजी रोड , येथिल घरगुती गोरी – गणपतीनां-कुरणी बंधारा , सरपिराजी तलाव, दत्त मंदिर,येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी मुरगूड नगर परिषदेने कुत्रिम गणेश विसर्जन कुंड उपलब्ध ठेवल्याने पर्यावरणपूरक . शाडुंची मुर्ती कुंडात विसर्जन करून श्री . महादेवराव साळोखे यांच्यासह अनेकानी नगरपालिका कर्मचाऱ्याच्याकडे मुर्ती दान करण्यात सहभाग घेतला.
एकंदरीत घरगुती गौरी -गणपती विसर्जन सुरळीत पार पडले. या विसर्जना वेळी मुरगूड पोलीस निरीक्षक गजानन सरगर व पोलिस कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.