बातमी

मुरगूड येथील “सुवर्णमहोत्सवी “श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेला २ कोटी ३१ लाखावर नफा – सभापती अनंत फर्नांडीस

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड आणि मुरगुड पंचक्रोशी बरोबरच सर्वदूर ख्याती असणार्‍या सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सह पतसंस्थेला २ कोटी ३१ लाख ५५ हजारावर निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षापेक्षा या वर्षी नफ्यामध्ये ३३ लाख ८५ हजार १६८ रूपयांची वाढ झाली आहे. पतसंस्थेच्या ५७ वर्षाच्या इतिहासातील सर्वात जास्त नफा २०२२ /२३ ह्या आर्थिक वर्षात झाला आहे त्यामुळे हे वर्षे या संस्थेला दैदिप्यमान यश मिळवून देणारे आर्थिक वर्ष आहे अशी माहिती संस्थेचे सभापती श्री.अनंत फर्नांडीस यांनी दिली.

या संस्थेच्या मुरगुड या मुख्य शाखेसह कुर ता.भुदरगड,सरवडे ता.राधानगरी, सावर्डे बु ता. कागल व सेनापती कापशी ता. कागल अशा पाच शाखा आहेत.या सर्व शाखांअंतर्गत संस्थेकडे ३३१५ इतके सभासद असुन १ कोटी ८० लाख ४८ हजार भागभांडवल जमा आहे तर ४ कोटी १८ लाख ९४ हजार स्वनिधी व २ कोटी ९६ लाख ४६ हजार राखीव निधी संस्थेकडे आहे.या संस्थेची वार्षिक उलाढाल ३९६ कोटी १५ लाख ७९ हजार इतकी आहे तर खेळते भांडवल ११७ कोटी ३८ लाख इतके विक्रमी झाले आहे.

या पतसंस्थेकडे पाच शाखाअंतर्गत एकुण ७५ कोटी २६ लाख ८७ हजार इतक्या ठेवी आहेत. त्यापैकी संस्थेकडून ५६ कोटी ४९ लाख ४० हजारावर कर्जवाटप केले आहे.एकुण कर्जवाटपापैकी केवळ सोनेतारणवर ३५ कोटी ४२ लाख २२ हजाराचे कर्जवाटप केले आहे.या संस्थेची ३१ कोटी ८१ लाख २५ हजारांची सुरक्षा गुंतवणुक आहे.

या संस्थेच्या दैदिप्यमान यशात संस्था उपसभापती श्री विनय पोतदार, संचालक सर्वश्री जवाहर शहा,पुंडलिक डाफळे,दत्तात्रय तांबट, किशोर पोतदार, रविंद्र खराडे, चंद्रकांत माळवदे, दत्तात्रय कांबळे, रविंद्र सणगर,जगदिश देशपांडे, सौ .सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, सौ .सुजाता सुतार, कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर सर्व शाखांचे शाखाधिकारी सौ. मनिषा सुर्यवंशी शाखा-मुरगुड, राजेंद्र भोसले शाखा-सेनापती कापशी, के.डी.पाटील शाखा-सरवडे, अनिल सणगर शाखा-सावर्डे बु, रामदास शिऊडकर शाखा-कुर यासह सर्व सेवक वृंद, सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *