मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. यापुढील काळातही संस्थेची अशीच भरभराट होईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री . उदयकुमार शहा यानीं दिली.
चेअरमन उदयकुमार शहा व संचालक एकनाथ पोतदार, तसेच इतर संचालक, सेवक वृंदानी केलेल्या १०० कोटी ठेवीचे उदिष्टपूर्ती केलेबद्ल कार्यलक्षी संचालक श्री. राहुल शिंदे व सर्व सेवक वृंदाचे अगदी मनापासून कौतूक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सेवकानी केलेल्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे .
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदैव आघाडीवर असणाऱ्या या संस्थेने १०० कोटीचे ठेविचे उदीष्ट पूर्ण केलया बद्दल फटांक्यांची आतषबाजी करून व साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. चेअरमन श्री. उदयकुमार शहा , व्हा . चेअरमन प्रकाश हावळ, संचालक सवश्री एकनाथ पोतदार, आनंदराव देवळे, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर, सोमनाथ यरनाळकर, राजाराम कुडवे, आनंदा जालिमसर, दत्तात्रय कांबळे, सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले, संस्थेचे कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे व कर्मचारी वर्गासह सभासद, नागरीक या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.