कागल( विक्रांत कोरे ) :
मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ,त्यांनी करनूर तालुका कागल येथील गिर्यारोहक शिलेदार अॅडव्हेंचर संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष सागर नलवडे यांचा मुलगा कु. शिवतेज सागर नलवडे याच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले.
सलग तीन दिवस झाले छत्रपती संभाजी राजे व त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गिर्यारोहक सागर नलवडे त्यांच्या पत्नी तेजस्विनी नलवडे व त्यांचा दीड वर्षाचा छोटा शिलेदार शिवतेज असा सर्व परीवार तीन दिवस उपोषणात सहभागी झाला होता.
अखेर शासनाने छत्रपती संभाजीराजे यांच्या मागण्या मान्य केल्या. आझाद मैदान मुंबई येथे दोन वर्षाचा करनूर येथील शिवतेज याच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. ही बातमी करनूर किंबहुना कागल तालुक्यात येऊन पोहोचताच आनंदाला उधाण आले. शिवतेज सह सागर नलवडे तेजस्वीनी नलवडे यांचेवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.