मुरगूड (शशी दरेकर) : माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा सत्कार व वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त मुरगूड शहर येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
तसेच त्यांच्या दीर्घायुषासाठी मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाईला अभिषेक देखील घालण्यात आला. यावेळी अन्नपूर्णा शुगरचे संचालक धनाजी गोधडे, राजेश भराडे यमगेचे सरपंच दिलीप पाटील ऊस पुरवठा अधिकारी सुनील देसाई मार्केटिंग अधिकारी ओंकार पोतदार, सेवानिवृत्त पोलिस-निवास कदम, संभाजी भोसले ,कलंदर मुजावर, विक्रांत भोपळे , दिलीप कांबळे, वैदकिय अधिकारी अमोल पाटील, आरोग्य कर्मचारी राजेंद्र गोधडे, रोहित घाटगे, राहुल गोरुले,राज सुर्यवंशी, पृथ्वीराज कदम ,विजय कुंभार, शरद भारमल यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ अन्नपूर्णा शुगरचे कर्मचारी, रुग्ण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .