मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३३००सभासदाचा ओशिएन्टल इश्योरन्स कंपनीकडे जी .पी. ए .विमा उतरविलेला होता. संस्थेच्या शाखा सावर्डे बुII येथिल मयत सभासद कै . शामराव बाबु सुर्यवंशी रा .पिपळगांव बु II यांचा आपघाती मृत्यू झाल्याने सदर योजनेतून सभासदाचे पश्यात वारस श्रीमती आक्काताई शामराव सूर्यवंशी यानां दि ओरीएन्टल इश्योरन्स कंपनी निपाणी यांचेकडून मिळालेल्या एक लाख रुपयाचा चेक वितरण कार्यक्रम श्री. लक्ष्मी -नारायण पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संपन्न झाला .
या चेक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सभापती श्री . अनंत बस्तू फर्नांडीस हे होते . चेकचे वितरण संस्थेचे सभापती , उप सभापती, संचालक यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री . जवाहर शहा यानी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेतला.
यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री . चंद्रकांत माळवदे यानी केले . तर आभार संचालक श्री . किशोर पोतदार यानीं मानले .
या चेक वितरण प्रसंगी संस्थेचे उपसभापती श्री .विनय पोतदार , संस्थापक संचालक श्री . जवाहर शहा , संचालक सर्वश्री पुंडलीक डाफळे , दत्तात्रय तांबट , किशोर पोतदार , रविंद्र खराडे , चंद्रकांत माळवदे , दत्तात्रय कांबळे , रविंद्र
सणगर, जगदिश देशपांडे , सौ . सुनिता शिंदे , श्रीमती भारती कामत , सौ . सुजाता सुतार , कार्यलक्षी संचालक श्री . नवनाथ डवरी , सचिव श्री . मारूती सणगर , शाखाधिकारी मनिषा सुर्यवंशी ( मुरगूड ), राजेंद्र भोसले ( सेनापती कापशी ) , के.डी. पाटील ( सरवडे ) , अनिल सणगर ( सावर्डे बु॥ ) , रामदास शिऊडकर (कूर ) यांच्यासह सेवक वर्ग, सभासद उपस्थित होते .